आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर संत शिरोमणी सेना महाराज मंदिरात भजन व महाप्रसादाचे वाटप

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत शहरातील न्हावी गल्ली येथील संत सेना महाराज मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताई महिला भजनी मंडळ, शहाजीनगर यांच्या वतीने सुंदर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

याच कार्यक्रमात कर्जत शहरातील सदगुरू गोदड महाराज तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद शहा यांची कन्या श्रुतीताई शहा यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल नाभिक समाज संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच गेल्या १९ वर्षांपासून विश्वनाथराव काशीद हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्जत शहरातील स्नेहप्रेम अनाथ आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घरी खिचडीच्या महाप्रसादाचे भोजन घालतात. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचा गौरव म्हणून नाभिक समाज संघटनेच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी नामदेव थोरात, यशवंत थोरात, संतोष थोरात, अनिल थोरात, बाळासाहेब थोरात, प्रताप थोरात, संजय राऊत, सुनील भोज, गोविंद थोरात, छोटू थोरात, भीमराव थोरात, किरण काशीद, नंदकिशोर थोरात, योगेश थोरात, ओंकार थोरात, अनिकेत थोरात, शिवम थोरात, ओम जाधव तसेच सुषमाताई थोरात, शोभा शेळके, अश्विनी थोरात, शीतल थोरात, वर्षा थोरात, लता थोरात, मनीषा थोरात, प्रतीक्षा शेळके, उमा थोरात, रोहिणी थोरात व साधना थोरात यांची उपस्थिती होती.

नाभिक समाज संघटनेचे युवक अध्यक्ष नामदेव थोरात म्हणाले, आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा. आज श्री संत सेना महाराज मंदिरात आपण सर्वजण आषाढी एकादशी साजरी करीत आहोत. संघटनेच्या वतीने श्रुतीताई शहा यांचा सत्कार करत आपण त्यांचा सन्मान करत आहोत.