कर्जत शहर डॉक्टर्स असोसिएशनच्या समन्वयकपदी डॉ. प्रविण जगताप यांची निवड

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत शहर डॉक्टर्स असोसिएशनच्या समन्वयक पदी डॉ. प्रविण जगताप यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल वैद्यकीय क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

डॉ. प्रविण जगताप हे सामाजिक, वैद्यकीय व संघटनात्मक कार्यात सक्रिय असून त्यांनी अनेक उपक्रमांद्वारे डॉक्टर व सर्वसामान्य नागरिकांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वगुणांचा असोसिएशनच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या निवडीनंतर डॉ. जगताप यांनी असोसिएशनच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन डॉक्टरांच्या हितासाठी, आरोग्यविषयक जनजागृतीसाठी तसेच समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

त्यांच्या या निवडीबद्दल विविध वैद्यकीय संघटना, सहकारी डॉक्टर, सामाजिक संस्था व हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.