
केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या सुरू असलेल्या स्पर्धेत बागल सर्विसेस टीमने उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय यशामुळे बागल सर्विसेसच्या ७ हेल्थ प्लॅनर्सची थायलंडमधील फुकेट येथे होणाऱ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी निवड झाली आहे. या निवड झालेल्या हेल्थ प्लॅनर्समध्ये ज्ञानेश्वर बागल, अक्षय शेळके, निलेश सुपेकर, सागर डाळिंबे, सागर सोनमाळी, बापूसाहेब मांडगे आणि अमित सुपेकर यांचा समावेश आहे.

या यशामुळे कंपनीमध्ये बागल सर्विसेसची वेगळी ओळख निर्माण झाली असून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यासाठी कंपनीकडून विशेष सहकार्य उपलब्ध होत आहे. आगामी काळात ग्राहकांना आणखी उत्तम आणि जलद सेवा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू, असे महेंद्र बागल यांनी सांगितले. केअर हेल्थ इन्शुरन्स व बागल सर्विसेसवर विश्वास दाखवणाऱ्या सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानत फुकेट इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी पात्र ठरलेल्या सर्व सात हेल्थ प्लॅनर्सचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


