कर्जतमध्ये ६० केडब्ल्यू क्षमतेचे पहिले ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू

कर्जत : प्रा. किरण जगताप

पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी कर्जत शहरात प्रथमच ६० केडब्ल्यू क्षमतेचे अत्याधुनिक ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. राशीन रोड, कोळवडी येथील माऊली पेट्रो स्टेशन (एचपी) येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता जलद व सुरक्षित चार्जिंगची सोय मिळणार आहे.

या चार्जिंग स्टेशनवर दोन चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध असून सर्व प्रकारच्या फोर-व्हीलर इलेक्ट्रिक वाहनांना फास्ट चार्जिंगची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे कर्जत तसेच नगर, पुणे आणि आसपासच्या भागातून प्रवास करणाऱ्या ईव्ही वाहनचालकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार असून चार्जिंगसाठी दूरवर जाण्याची गरजही कमी होणार आहे. जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा हे या केंद्राचे वैशिष्ट्य असल्याचे संचालकांनी सांगितले. तसेच शुद्ध, उच्च प्रतीचे पावर पेट्रोल व डिझेल,२४ तास सेवा आणि स्वच्छ परिसर व विनम्र सेवा आहे.

पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमामुळे कर्जत तालुक्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अधिक माहितीसाठी ८९५६५३५६६७ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संचालकांनी केले आहे.