
कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विशाल भरत जांभळे तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब छबुराव परकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे गावातील पालक व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी नव्या पदाधिकाऱ्यांकडून प्रभावी कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

निवड प्रक्रियेनंतर झालेल्या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सरपंच राजू जांभळे, माजी सरपंच रमेश जांभळे, चेअरमन राजेश जांभळे, राहुल मोरे, पांडुरंग जगताप, तेजस भोसले, सुजित शिंदे, नवनाथ जांभळे, ध्रुव जांभळे, संजय जांभळे, संतोष भोसले, पोपट जांभळे, अण्णा परकाळे, दीपक कोऱ्हाळे तसेच शाळेतील सर्व पालक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेची गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि पालक-शाळा समन्वय अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

