
दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा. सीमा सखाराम डोके यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मराठी विषयातील पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. प्रा. सीमा डोके यांनी “१९९० नंतरच्या निवडक लेखकांच्या कादंबऱ्यातील स्त्री-पुरुष व्यक्तिरेखांचा विवेचक अभ्यास” या विषयावर संशोधन करून ही पदवी संपादन केली. त्यांच्या संशोधनास महात्मा फुले नूतन महाविद्यालय, मिरजगाव येथील प्रा. डॉ. आप्पा माने यांचे मार्गदर्शन लाभले. हे संशोधन पद्मश्री विखे पाटील कॉलेज, प्रवरानगर-लोणी येथील संशोधन केंद्रात पूर्ण करण्यात आले. संशोधनाच्या मौखिक परीक्षेसाठी डॉ. नितीन रिंढे (मुंबई) यांनी बहिःस्थ परीक्षक म्हणून तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

डॉ. सीमा डोके यांच्या संशोधन कार्यामध्ये प्राचार्य डॉ. संजय नगरकर, डॉ. संदीप सांगळे, डॉ. शिरीष लांडगे, डॉ. सुधाकर शेलार, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. शांताराम चौधरी, डॉ. राजेंद्र सलालकर आदि प्राध्यापकांचे मार्गदर्शनपर सहकार्य लाभले. तसेच कुटुंबातील त्यांचे पती राजू दौलत डाके, सासरे कै. दौलत डाके, सासू रुक्मिणी डाके, वडील सखाराम डोके, आई सुनीता डोके, याशिवाय कुटुंबातील जान्हवी, सुदर्शन, तनुजा, कौस्तुभ, समृद्धी, संस्कृती, गार्गी, विकास, संकेत आदि कुटुंबातील सदस्यांचा संशोधन कार्यात कायम पाठिंबा मिळत गेला.

डॉ. सीमा डोके यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, अंबादास पिसाळ, बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

