डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या जयंतीनिमित्त कर्जत लाईव्ह आयोजित तालुकास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

कर्जत : प्रा. किरण जगताप

ज्येष्ठ विचारवंत व माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त कर्जत लाईव्हच्या वतीने इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कर्जत तालुकास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. दिलेल्या विषयातील एका विषयाची निवड करून कर्जत तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

वक्तृत्वासाठी विषय :
(पाचवी ते आठवी गट )

१. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे जीवन आणि कार्य
२. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे?
३. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे विचार आणि आजची पिढी
४. माझे आवडते व्यक्तिमत्त्व
५. माझे गाव, माझा अभिमान
६. माझ्या स्वप्नातील शाळा

वक्तृत्वासाठी विषय : ( नववी ते बारावी गट )

१. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सामाजिक कार्य
२. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची आजच्या तरुणाईला गरज
३. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे गांधीवादी विचार
४. लोकशाही आणि विद्यार्थी
५. सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे
६. भारतीय संविधान आणि आपण

विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी आणि २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपल्या वक्तृत्वाचा ४ ते ५ मिनिटांचा व्हिडिओ ‘कर्जत लाईव्ह’च्या 7030952275 या नंबरवर पाठवावा.

प्राप्त झालेल्या व्हिडिओच्या आधारे परीक्षण करून पहिल्या गटासाठी २ आणि दुसऱ्या गटासाठी २, अशी एकूण ४ बक्षिसे व प्रशस्तीपत्रके विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या जयंतीदिनी २१ ऑगस्ट २०२६ रोजी खेड येथे समारंभपूर्वक वितरित करण्यात येतील. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशस्तीपत्रके वितरीत केली जातील.

व्हिडिओसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हिडिओमध्ये चेहऱ्यापासून कमरेपर्यंतचा भाग आडव्या कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसावा. व्हिडिओ निसर्गाच्या सानिध्यात काढावा, बंदिस्त खोलीत काढू नये, आजूबाजूला गोंगाट नसावा. विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश पडेल, अशा ठिकाणी चित्रीकरण करावे.