
कर्जत – नांदगाव रस्त्यावरील साईडपट्ट्यांवर वाढलेली झाडे-झुडपे तसेच रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना तालुका प्रमुख बळीराम (अण्णा) यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख दीपक मांडगे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासह साईडपट्ट्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली होती.

शिवसेना शहर प्रमुख दीपक मांडगे यांनीही या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर नांदगाव रस्त्यावरील साईडपट्ट्यांवरील वाढलेली झाडे-झुडपे हटविण्यात आली असून रस्त्यावरील खड्डेही बुजविण्यात आले आहेत.
रस्त्याची दुरुस्ती व स्वच्छता झाल्यामुळे वाहनचालक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन बळीराम (अण्णा) यादव यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांचे कार्यकर्ते दीपक मांडगे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हे काम मार्गी लागल्याची भावना नांदगाव ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नांदगाव ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख बळीराम (अण्णा) यादव आणि दीपक मांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी तत्परतेने पाठपुरावा करून समस्या सोडविल्याबद्दल ग्रामस्थांनी दोघांचेही कौतुक केले.

