कर्जत : मालकीच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप; कायदेशीर कारवाईची मागणी

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी ग्रामपंचायत हद्दीतील नवीन गावठाण परिसरात मालकीच्या खुल्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण होत असल्याचा आरोप करीत निलेश सुभाष सकट व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत टाकळी खंडेश्वरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांकडे २१ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अरुण आखाडे, शिवा आखाडे, शिल्पा आखाडे, राधाबाई आखाडे, शिवाजी आखाडे, मालन आखाडे, सुरेखा आखाडे, प्रशांत आखाडे आणि नवनाथ आखाडे उपस्थित होते. निवेदनानुसार, नवीन गावठाणमध्ये वडील व आजोबांच्या नावे वाटप झालेल्या खुल्या जागेचे ते वारसदार आहेत. मात्र, संबंधित व्यक्तीकडून त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये पोल उभारण्याचा प्रयत्न केला जात असून त्यास विरोध केल्यावर दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामसभेतही ठराव झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच मालकीच्या जागेचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.