दुरगावमध्ये अवैध दारूविक्रीवर कारवाई; मुद्देमाल जप्त

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत राजू नाना निकम (रा. दुरगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुरगाव येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना आरोपी विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देशी व विदेशी दारू विक्री करताना मिळून आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या कारवाईत देशी दारूच्या ९० मिलीच्या १२३ बाटल्या, २५ बाटल्या, १८० मिलीच्या ७ बाटल्या तसेच ५०० मिलीच्या ६ कॅन, असा एकूण ७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रविण सुतार करीत आहेत.