राजुरी स्टील व ऋषिकेश सेल्स कॉर्पोरेशनतर्फे मिस्त्री बांधवांचा स्नेहमेळावा उत्साहात

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत येथील हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह येथे राजुरी स्टील यांच्या वतीने आणि ऋषिकेश सेल्स कॉर्पोरेशनच्या काउंटरमार्फत मिस्त्री तसेच बांधकाम क्षेत्रातील कारागीर बांधवांसाठी विशेष स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. परिसरातील मिस्त्री बांधवांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बांधकाम क्षेत्रातील मिस्त्री बांधवांशी असलेले स्नेहाचे व विश्वासाचे संबंध अधिक दृढ करणे, त्यांच्या अडचणी व गरजा जाणून घेणे तसेच व्यावसायिक सहकार्य वाढविणे या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मिस्त्री बांधवांशी संवाद साधत बांधकाम क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राजुरी स्टीलच्या वतीने उपस्थित मिस्त्री बांधवांना प्रेमपूर्वक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे उपस्थित मिस्त्री बांधवांमध्ये आनंदाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे कौतुक करत उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानले.

या स्नेहमेळाव्याचे आयोजन ऋषिकेश सेल्स कॉर्पोरेशनचे यश नानासाहेब शिंदे यांनी केले होते. मिस्त्री बांधवांच्या विश्वासाला आणि सहकार्याला कायम प्राधान्य देत बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीसाठी तसेच मिस्त्री बांधवांच्या सन्मानासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असा मानस यश नानासाहेब शिंदे आणि राजुरी स्टीलच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

राजुरी स्टील आणि ऋषिकेश सेल्स कॉर्पोरेशनच्या या उपक्रमामुळे मिस्त्री बांधवांशी असलेले विश्वासाचे, स्नेहाचे आणि सहकार्याचे नाते आणखी दृढ झाले आहे.