
शिवसेना युवासेनेच्या कर्जत शहरातील संघटनात्मक विस्ताराला चालना देत विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रज्वल भोज यांची युवासेना उपशहरप्रमुखपदी, आदित्य चिंचकर यांची युवासेना उपतालुकाप्रमुखपदी, प्रणव माने यांची शिवसेना विद्यार्थी आघाडी शहरप्रमुखपदी, वैभव शिंदे यांची युवासेना संघटक कर्जत शहरप्रमुखपदी, तर जयेश सोनवणे यांची युवासेना उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

युवासेनेच्या माध्यमातून युवकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, युवकांना संघटित करणे तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी सक्रियपणे कार्य करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे कर्जत शहर व तालुक्यात युवासेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख अभिषेक राजे भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन तोरडमल, युवासेना तालुकाप्रमुख माधव जठार, युवासेना शहर प्रमुख अमित माने, विशाल माने, सुदाम गदादे, सावता अनारसे, शुभम अनारसे, प्रणय गव्हाणे आणि हर्षद तिवारी उपस्थित होते.

