
कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारातील सीना नदीपात्रात विनापरवाना वाळू उपसा करताना महेंद्र सदाशिव डाडर (वय ३८, रा. नागलवाडी, ता. कर्जत) याच्याविरुद्ध मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ८ लाख १० हजार रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ९०९ टेम्पो जप्त केला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ यांनी फिर्याद दिली. महेंद्र डाडर याच्याकडे परवाना किंवा रॉयल्टी पावती नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कासार अधिक तपास करीत आहेत.


