
आर्मी स्कूल ज्योतिबावाडी, ता. कर्जत येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कॅडेट अथर्व सुनील झांजे याने प्रथम क्रमांक, तर कॅडेट भूषण हनुमंत कुमखाले याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कुस्ती स्पर्धेत कॅडेट सोहम खोलासे आणि कॅडेट प्रतीक बाराते यांनी प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आर्मी स्कूलचे प्रणेते न्यायमूर्ती श्री खराडे, संस्थापक संजय खराडे, मुख्याध्यापक चव्हाण, शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक तसेच पालकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचे नाव तालुक्यात उज्ज्वल झाले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

