चौथ्यांदा अजिंक्य ! हॉलीबॉलमध्ये आर्मी स्कूलचा दबदबा कायम

कर्जत : प्रा. किरण जगताप

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेत आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग चौथ्या वर्षीही उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. तालुकास्तरीय स्पर्धेत विजयी राहून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही शाळेकडून विशेष प्रोत्साहन दिले जाते. शिक्षणासोबत खेळाची आवड जोपासत विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांसाठी मार्गदर्शन व सरावाची संधी उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली आहे. या संघात कॅडेट मोझम काझी कर्णधार कॅडेट कार्तिक मदने कॅडेट भूषण कुमखाले कॅडेट श्री क्षीरसागर कॅडेट विशाल जाधव कॅडेट अथर्व पवार कॅडेट सोहम मदने कॅडेटआदर्श खिळे या सर्व खेळाडूंचे आर्मी स्कूलचे प्रणेते न्यायमूर्ती. श्री. खराडे साहेब, संस्थापक श्री. संजय खराडे सर,मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक तसेच पालकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.