कर्जत तालुक्यातील भूमिपुत्र ॲड. योगेश कापरे यांना मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन

कर्जत : प्रा. किरण जगताप

आंबेगाव येथील कार्यालय हवेली क्रमांक २० येथे सह दुय्यम निबंधक यांच्यासोबत झालेल्या कथित मारहाण प्रकरणात आरोपी करण्यात आलेले कर्जत तालुक्यातील भूमिपुत्र ॲड. योगेश कापरे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात ॲड. योगेश कापरे यांच्यासह ॲड. महेश भराटे, तुषार कापरे, दीपक शिंदे आणि धर्मेश राठोड यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील प्रभारी सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्याशी संबंधित बाबींवरही न्यायालयीन सुनावणीदरम्यान चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

न्यायालयाने संबंधित सह दुय्यम निबंधकांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. तसेच प्रभारी सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्याबाबत सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिल्याचे सांगण्यात आले आहे. रवींद्र कोळी यांना दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान ॲड. योगेश कापरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या समर्थकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.