कर्जत तालुका भाजपा युवा मोर्चाची तालुका कार्यकारिणी जाहीर

कर्जत : प्रा. किरण जगताप

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांच्या सूचनेने आणि जिल्हा संघटन सरचिटणीस शेखर खरमरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कर्जत तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके यांनी जाहीर केली.

तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना संघटित करून पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना युवकांपर्यंत व लोकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने युवा मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढवून विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अतुल महारुद्र जगताप, गोकुळ बालभीम इरकर, अरविंद रघुनाथ पवार, गोवर्धन दादासाहेब खेडकर आणि साईराज प्रकाश शिंदे यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी स्वप्निल ईश्वर तोरडमल, यशराज नितीन बोरा, दादा कल्याण डिसले आणि हर्षल आप्पासाहेब जवणे, तर चिटणीसपदी महेंद्र बबन धांडे, अनिल देविदास गदादे, तानाजी महादेव चांडे, अमोल सुरेश तांदळे आणि नितीन अंकुश महारनवर यांची नियुक्ती करण्यात आली.
कर्जत शहराध्यक्षपदी पांडुरंग दत्तात्रय क्षीरसागर, कर्जत शहर उपाध्यक्षपदी धनंजय दादा आगम मिरजगाव शहराध्यक्षपदी अमोल देशमाने, तर मिरजगाव शहर उपाध्यक्षपदी संकेत अनिल वाहिल यांची निवड झाली. तसेच सोशल मीडिया प्रमुखपदी अभिषेक रमेश गवारे, सोशल मीडिया सहप्रमुखपदी रमेश बाळू गोयकर , सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल चंद्रकांत बर्डे आणि सोशल मीडिया प्रसिद्धी सहप्रमुखपदी अनिकेत ननवरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अभय पाटील, गटनेते सतीश पाटील, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, भाजपा नेते सुनील यादव, पप्पूशेठ धोदाड, नंदलाल काळदाते, उदयसिंग राजपूत, दादा डिसले, पांडुरंग क्षीरसागर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.