भाजप युवा मोर्चा कर्जत शहर उपाध्यक्षपदी धनंजय आगम

कर्जत : प्रा. किरण जगताप

विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.

या कार्यकारिणीत कर्जत शहर उपाध्यक्षपदी धनंजय आगम यांची निवड करण्यात आली आहे. धनंजय आगम हे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित असून सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर असतात. पक्षाची ध्येयधोरणे व विचारसरणी तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धनंजय आगम यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर कर्जत शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मानाची आणि प्रेरणादायी आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहरातील युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे असे आगम यांनी सांगितले.

या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धनंजय आगम यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.