भाजप युवा मोर्चा मिरजगाव शहर उपाध्यक्षपदी संकेत वहिल

कर्जत : प्रा. किरण जगताप

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके यांनी युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत मिरजगाव शहर उपाध्यक्षपदी संकेत वहिल यांची निवड करण्यात आली आहे.

संकेत वहिल हे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित असून सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर असतात. पक्षाची ध्येयधोरणे व विचारसरणी तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी संकेत वहिल यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर मिरजगाव शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या निवडीबद्दल मिरजगाव अध्यक्ष गणेश नलावडे, युवा मोर्चा अध्यक्ष अमोल देशमाने, सरपंच नितीन खेतमाळस, संपतराव बावडकर, परमवीर पांडुळे, सारंग घोडेस्वार, डॉ. पंढरीनाथ गोरे, लहुजी वतारे, अंकुश म्हेत्रे, महेश माने, तुषार म्हेत्रे, अभिजीत कांबळे, अमोल बावडकर, किशोर कोल्हे, धनु सातव, दिग्विजय बावडकर, प्रवीण माने, ऋषी खेतमाळस, दादा तनपुरे, अतुल जाधव, अजय दळवी, हर्षल जवने, पंडा बोरुडे, निलेश सातपुते, आशिष शिंदे, अशोक शिंदे आणि संदीप बुद्धिवंत यांनी संकेत वहिल यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.