
शिवसेना युवासेनेच्या उपशहरप्रमुखपदी गणेश दिलीप जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेकराजे कैलास भोसले यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश जगताप हे कर्जत येथील रहिवासी असून त्यांच्यावर युवासेनेच्या माध्यमातून पक्षवाढीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवसेनेचे विचार सक्रियपणे जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
युवासेना उपशहरप्रमुखपदी निवड केल्याबद्दल गणेश जगताप यांनी युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेकराजे कैलास भोसले यांचे आभार मानले. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून युवासेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या नियुक्तीमुळे गणेश जगताप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

