खेड महाविद्यालयात महाराष्ट्रदिनी होणार अभ्यासिकेचे उद्घाटन

कर्जत : प्रा. किरण जगताप

भारतीय समाज विकास संशोधन संस्था संचलित कर्जत तालुक्यातील खेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘अभ्यासिका’ सुरू होत आहे.या उपक्रमाचे उद्घाटन १ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी यांच्या हस्ते होणार आहे.

ही अभ्यासिका विशेषतः स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या युवकांना लक्षात घेऊन उभारण्यात आली आहे. अभ्यासिकेमध्ये इंटरनेट सुविधा, लायब्ररी, तसेच ऑनलाईन पुस्तकांचा उपयोग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत, निसर्गरम्य व प्रेरणादायक वातावरण मिळावे यासाठी अभ्यासिकेची रचना करण्यात आली आहे.

परगावच्या विद्यार्थ्यांसाठीही अभ्यासिकेसह निवासाची सुविधा अल्प दरात देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व नियमित उपलब्ध राहणारी अभ्यास सुविधा मिळणार असून त्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.