
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत कुकडी प्रकल्पाच्या उन्हाळी हंगाम २०२४- २५ च्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशानुसार ही बैठक ५ मे २०२५ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.

कुकडी डावा कालवा आवर्तनासंदर्भात महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहेत. विशेषतः कर्जत तालुक्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कुकडी डाव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन लवकर सोडल्यास शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरेल. कुकडीच्या उन्हाळी हंगामातील आवर्तनाबाबत लोकांच्या भावना लक्षात घेऊन अपेक्षित निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कर्जत संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.