कर्जत तालुका आरोग्य फॅमिलीकडून आर.एस.पी. अधिकाऱ्यांचा सन्मान

कर्जत : प्रा. किरण जगताप

जगभरातील ९५ देशांमध्ये कार्यरत असलेल्या, नोबेल पुरस्कार विजेते, आहार व कार्डिअ‍ॅक वर्कआउट तज्ज्ञ शास्त्रज्ञ मार्क ह्युज यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेल्या जागतिक वेलनेस आणि फिटनेस सिस्टिमच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना निरामय आरोग्य प्रदान करण्यात आले आहे.

याच जागतिक सिस्टिमचा भाग असलेल्या कर्जत तालुका वेलनेस फॅमिलीच्या वतीने कर्जत तालुक्याचे आर.एस.पी. समादेशक अभिमन्यू नारायण बेरगळ आणि नुकतेच पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे आर.एस.पी. अधिकारी प्रशिक्षण ५३ व्या वर्षी यशस्वीरित्या पूर्ण करणारे शिक्षक सुनील अर्जुन गोरखे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

“आरोग्य फॅमिली ही २० टक्के वर्कआउट, ८० टक्के संतुलित आहार आणि १०० टक्के ग्रेट कोचचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीवर आधारित असून गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतभर प्रभावीपणे कार्यरत आहे,” असे प्रतिपादन गेट टीम सदस्य संजय ठोकळ आणि कविता ठोकळ यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्य गृह विभाग, पोलीस व शिक्षण विभागाच्या अधिकाराअंतर्गत वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण (आर.एस.पी.) अधिकारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून, आरोग्य आणि वर्कआउटचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर मांडणारे सुनील गोरखे आणि स्वतःच्या अनेक अडचणींवर मात करत निरामय आरोग्य प्राप्त करणारे तालुका समादेशक अभिमन्यू नारायण बेरगळ यांचे कार्य हे शालेय विद्यार्थी व भारताच्या भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, असे विचार जागतिक आरोग्य सल्लागार विशाल शिंदे व भागवत गायकवाड यांनी मांडले.

निरोगी आरोग्यासाठी आणि व्याधीमुक्त जीवनासाठी दररोज मोफत कार्डिअ‍ॅक वर्कआउट करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या सन्मान सोहळ्यात आरोग्य फॅमिलीतील ग्रेट कोच रवी शिंदे, अरुण शेलार, राहुल भोगे, गंगाराम पालवे यांनी सहभागी होत आर.एस.पी. कर्जत तालुका समादेशक अभिमन्यू बेरगळ आणि आर.एस.पी. अधिकारी सुनील गोरखे यांचे कौतुक केले.