कोटा मेंटॉर्स स्कूलच्या तक्रारीबाबत कर्जतच्या शिक्षण विभागास स्मरणपत्र

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलच्या गैरकारभाराबाबत पालक किरण जगताप यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे २८ ऑगस्ट २०२३ रोजी लेखी तक्रार अर्ज केलेला आहे. मात्र त्या अर्जाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने प्रतिसाद न दिल्याने जगताप यांनी शिक्षण विभागाला स्मरणपत्र दिले आहे.

भाग : ४

पत्रात म्हटले आहे, माझा मुलगा संस्कार जगताप हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. त्याचा आरटीईमधून प्रवेश झालेला असूनही शाळेतून त्याच्या १३००० रुपयांच्या फीची सक्तीने मागणी करण्यात आली. याबाबत तसेच शाळेतून गणवेश, बुट व इतर साहित्याची अनधिकृतपणे होत असलेली विक्री, शाळेतून पालकांना दिल्या जात नसलेल्या पावत्या, शिक्षकांना नियुक्ती आदेश, वेतन न देणे, शाळेमध्ये विविध माहिती फलक न लावणे, शालेय इमारतीचा इतर कामांसाठी वापर करणे, अपुऱ्या माहितीच्या आधारे शाळेची जाहिरातबाजी करणे अशा ७ मुद्द्यांच्या आधारे सविस्तर तक्रार देण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी अशी तक्रार अर्जातून करण्यात आली होती.

मात्र लेखी तक्रार देवून ४० दिवस झाले तरी शिक्षण विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबतची लेखी स्वरूपातील माहिती पुढील ७ दिवसात न दिल्यास आपल्याविरुद्ध वरिष्ठ कार्यालय तसेच विविध विभागांकडे तक्रार दिली जाणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

( क्रमशः)