कर्जत तालुक्यातील राशीन येथील युवा नेते राजेंद्र देशमुख यांनी येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे.
कार्यकर्ते व नागरिकांच्या मेळाव्यात राजकीय दिशा ठरवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानुसार बुधवारी रात्री राशीन येथील भव्य मेळाव्यात त्यांनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत हाती तुतारी घेणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. या मेळाव्यासाठी राशीन जिल्हा परिषद गटातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
किशोर कांबळे, राशीन