राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे, पण आता हे थोडं जास्त झाल्यासारखं वाटतंय. याचा फटका भाजप महायुतीला बसणार आहे. माझ्या निरीक्षणानुसार, महायुतीला राज्यात फक्त ८५ जागा मिळतील. भाजपला ४७ जागा आणि इतर घटक पक्षांना ३८ जागा मिळतील. यंदा महायुती शंभरचा आकडा पार करू शकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे, महाविकास आघाडीची यंदाची दिवाळी मात्र गोड होणार आहे. शरद पवार यांच्या पक्षाला ६७ जागा मिळतील, तर इतर घटक पक्षांना १३० जागा मिळतील. एकूण महाविकास आघाडीला १९७ जागा मिळतील. त्यामुळे यंदा राज्यात परिवर्तन होणार असून, एकहाती सत्ता महाविकास आघाडीची येणार आहे. सत्तापरिवर्तनामुळे यंदा सर्व शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेची खरी दिवाळी साजरी होणार आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वात कमी म्हणजे ४७ जागा मिळतील, आणि ५० जागांचा आकडाही भाजप पार करू शकणार नाही.