चाळीस वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर आ. रोहित पवारांकडून मार्गी

कर्जत : प्रा. किरण जगताप

खामकर वस्ती, बनकरकर वस्ती, आणि खोमणे वस्ती या देऊळवाडी वार्डातील रहिवासी आहेत. या वस्त्या गावठाणापासून दूर विखुरलेल्या होत्या. या वस्त्यांमध्ये गेल्या ४० वर्षांपासून सिंगल फेस किंवा थ्री-फेज वीजपुरवठा नव्हता. या वार्डावर भाजपाचे कायमस्वरूपी वर्चस्व असले तरी माजी मंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही या प्रश्नाचे समाधान झाले नव्हते.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी

सतीश खोमणे यांनी रात्री १०:३० वाजता आमदार रोहित पवार यांना फोन करून, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्याकडे वीज नाही, अशी व्यथा मांडली. यानंतर, आ. पवार यांनी स्थानिक पदाधिकारी हनुमंत भोसले यांच्याकडे चौकशी केली. चौकशीनंतर, खरोखरच वीजपुरवठ्याची आवश्यकता असल्याचे समजल्यावर, आमदार रोहित पवार यांनी आमदार निधीतून चार लाखांचा निधी मंजूर केला.

ग्रामस्थांनी विनंती केली की चार लाखांच्या निधीत हा प्रश्न सुटणार नाही. त्यानुसार, आमदार पवार यांनी बदली प्रस्ताव तयार करून आठ लाखांचा निधी प्रस्तावित केला. पक्षभेद न करता तात्काळ निधी मंजूर केल्यामुळे देऊळवाडी, सिद्धटेक, बेर्डी परिसरात आमदार रोहित पवार यांचे कौतुक होत आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये सोडवलेल्या प्रश्नाचे उत्तर मताधिक्याने दिले जाईल, असे ग्रामस्थ म्हणत आहेत.

पुनश्च, आमदार रोहित पवार यांचे अभिनंदन!

हनुमंत भोसले, बेर्डी