मतांचा विचार करून मत मांडणारे अनेक आहेत, पण मतांचा विचार न करता विकासकामे करणारे रोहितदादा पवार हे एकमेव आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी व्यक्त केले आहे.
कोऱ्हाळे यांनी पुढे म्हटले आहे, कर्जत-जामखेड मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ ला कर्जत-जामखेड तालुक्यातील जनतेने ठरवले आहे की, कमळाचे विसर्जन करायचे आहे. आता वाजणार तर फक्त तुतारीच. आपल्या कर्जत-जामखेड विधानसभेच्या विकासासाठी आपल्या हक्काचे आमदार रोहित पवार यांना आशीर्वाद, शक्ती आणि खंबीर साथ देऊया. कर्जत- जामखेड जनतेच्या हक्काचे दमदार नेतृत्व विधानसभेत पाठवू. दमदार आमदार, कामगिरी जोरदार. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचा आवाज जनतेचा, आमदार रोहितदादा पवारच !
कर्जत-जामखेडच्या सर्वसामान्य जनतेने विधानसभेतही मतदारांची ताकद दाखवावी. जनतेला वाटत आहे की, तालुक्यात भाजपाची सत्ता नकोय. आपल्या कर्जत-जामखेडमध्ये विरोधक १० वर्षे आमदार आणि मंत्रीपद मिळवून, परत एक वेळा विधानपरिषद मिळवूनही कर्जत-जामखेडच्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. दुसऱ्याने केलेल्या कामांवर स्वतःचे नाव जोडण्याची वेळ येते. त्यामुळे विरोधक जनतेसाठी नाही, तर सत्तेसाठी विधानसभा लढत आहेत. रोहितदादा पवार यांच्या विरोधात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव होणार आहे, कारण रोहितदादा पवार हे गोरगरीब जनतेसाठी झटले आहेत. येत्या २० नोव्हेंबरला आपल्या मतरूपी अस्त्राने युतीच्या महाराक्षसाचा वध करायचा आहे, असेही कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे.व
वैभव पवार, कर्जत तालुका प्रतिनिधी