स्वाभिमानी जनता व कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांमुळे आ. रोहित पवार विक्रमी मतांनी विजयी होतील अशी प्रतिक्रिया युवा कार्यकर्ते आनंद भगत यांनी दिली. आ रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात थेटेवाडीसाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे दिल्याने गावाचा कायापालट झाला आहे, असे ते म्हणाले.
कार्यसम्राट आ रोहित पवार यांनी शेतमाल घरी व्यवस्थित आणण्यासाठी पाणंद रस्ता दिला. तसेच उन्हाळ्यात टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा केला. शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करून त्यांचा येण्या जाण्याचा वेळ वाचला व तसेच शालेय साहित्य , शेतकऱ्यांना मोफत पीक विमा आदी मोठी कामे आ रोहीत पवारांनी मंजूर केल्याने गावाचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला. राहिलेला गावाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ रोहित पवार यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात प्रत्येक घटकांसाठी आ रोहित पवारांनी काम केले असून युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी केलेले काम खूप प्रशंसनीय असून त्या कामाची पोचपावती म्हणून कर्जत- जामखेड मतदारसंघातील मतदार आ रोहित पवारांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देणारच आहेत याबद्दल कुणाच्याही मनात कोणतीही शंका नाही.
आमचा कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व युवावर्ग रोहित पवारांच्या अंगी असणाऱ्या नेतृत्वगुणांमुळे व पवार साहेबांसारखीच झपाटल्यासारखे न काम करण्याची क्षमता अंगी असल्यामुळे रोहित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू न इच्छितो. येणारे सरकार हे निश्चितच महाविकास आघाडीचे असणार आहे व त्यामध्ये रोहित पवार यांना मंत्री पद मिळणार असणार आहे याची मतदारसंघातील सर्वांना खात्री आहे आणि त्यामुळे मतदारसंघाचा जो विकास होणार आहे त्याचा झपाटा खुप हा खूप मोठा असणार असून आपल्या विचारांचे सरकार नसताना रोहित पवारांनी मागील अडीच वर्षात मतदारसंघात जी काही कामे केली आहेत ती विरोधकांना सरकार असतानाही दूरदृष्टी नसल्याने करता आली नाहीत.
आ रोहित पवारांनी कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग असल्यामुळे त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असल्याने त्यासाठी जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, गेट बसवणे, गाळ काढणे, ओढ्यांचे खोलीकरण या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला.
अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा आ रोहित पवार यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.
विरोधकांनी मतदारसंघात कामे आणण्याऐवजी रोहित पवारांनी आणलेली बहुतांश कामे अडवण्यात आणि मतदारसंघाचा विकास अडवण्यातच आपली सर्व शक्ती खर्च घातली. हे सर्व मतदार जाणून आहेत आणि त्याचा रोष ते मतदानातून व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
मतदारसंघातील विकासासाठी रोहित पवारांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही हे सर्व मतदार राजा जाणून असून आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व शेतकरी, युवक,विद्यार्थी, महिला, वृद्ध सर्व घटकांनी येणाऱ्या दि २० नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निश्चय केला असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.