कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकाऱ्यांकडून तपासणी

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकाऱ्यांकडून तपासणी सुरु असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी देवराम लगड यांनी दिली. पालक किरण जगताप यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार देऊन शाळेतील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या अर्जाच्या अनुषंगाने या शाळेची तपासणी केली जात आहे.

भाग : २

तक्रारदार यांचा मुलगा संस्कार जगताप हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) त्याचा प्रवेश झालेला आहे. या कायद्यान्वये या विद्यार्थ्यांची शिकवणी शुल्क ही शासनाकडून भरली जाते. तरीही कोटा मेंटॉर्स स्कूलमधून १३००० रुपये रकमेचे शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करण्यात आल्याने २४ ऑगस्ट २०२३ रोजी तात्काळ ही तक्रार करण्यात आली होती.

त्यानंतर पालक किरण जगताप यांनी कर्जतच्या शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रार अर्जात त्यांनी ७ गंभीर मुद्द्यांकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे. तालुका तसेच जिल्हास्तरीय समितीकडून शाळेची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रार अर्जावर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. शिक्षण विभागाच्या अहवालातून समाधानकारक उत्तरे आणि अंमलबजावणी न झाल्यास पुढील पाठपुरावा केला जाणार आहे.

वृत्त मालिका वाचण्यासाठी 7030952275 या नंबरवर Hi करून ‘कर्जत लाईव्ह’चा ग्रुप जोडून घ्यावा.