भोसे गावातून आ. राम शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळणार

कर्जत : प्रा. किरण जगताप


राम शिंदे साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे भोसे गावातील भाजप कार्यकर्ते आणि समर्थक प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन महायुती सरकारने केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवत आहेत. याचाच एक टप्पा म्हणून काटे वस्ती आणि ढोले वस्तीवर सर्व मतदारांच्या भेटी घेऊन राम शिंदे यांना मोठे मताधिक्य देण्याची विनंती शिंदे समर्थकांकडून करण्यात आली. यावेळी बोलताना तालुका दुध संघाचे संचालक दादासाहेब खराडे आणि राजेंद्र ढोले यांनी मार्गदर्शन करत राम शिंदे साहेबांनी सरकारच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची मोठी यादी मतदारांसमोर ठेवली. महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत,जलयुक्त शिवार ओढा खोलीकरण, सौर उर्जा प्रकल्पातून 90% रक्कम सरकार भरत असून शेतकऱ्याने फक्त दहा टक्के रक्कम भरायची आहे. रस्त्याची कामे, मुलींना उच्च शिक्षणासाठी शिक्षण मूल्य माफ, केंद्र आणि राज्य सरकारचे प्रत्येकी सहा हजार, लाडकी बहिण योजनेचे पंधरा हजार सरकार देत आहे.महायुती सरकारने विज बिल माफी केली तर याउलट महाविकास आघाडीच्या काळात तीन महिन्याला वीज बील वसुली केली जात होती.
यावेळी उपस्थीत सर्व मतदारांनी भूमिपुत्राला मोठ्या उमेदीने मतदान करणार असल्याचे सांगितले.
यावेळी तालुका दुध संघाचे संचालक दादासाहेब खराडे, माजी सरपंच, राजेन्द्र ढोले, रमेश राउत, बाळासाहेब ढोले, जालिंदर खराडे, मोहन ढोले, बंडू ढोले, सुनील ढोले, भाऊसाहेब राउत, रामा ढोले, ईश्वर राउत, ज्ञानदेव ढोले, आकाश राऊत, अविनाश क्षीरसागर, विक्रम खराडे, भीमा ढोले, भुजंग क्षीरसागर, दिपक खराडे, विकास राऊत, प्रदिप खराडे, लक्ष्मण काटे, अनिल खराडे, मयुर खराडे दिगंबर ढोले व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार राम शिंदे यांनी भोसे गावातील सर्व समाज घटकांना दलीत शोषित वंचिताना बरोबर घेत कोणताही भेदभाव न करता काम केल्यामुळे भोसे गावातून मताधिक्य देणार, असे सामाजिक कार्यकर्ते रमेश राऊत यांनी म्हटले आहे.

भोसे गावात जलसंधारणाची कामे  केल्यामुळे भोसे गावातील सर्व मतदार उस्फूर्तपणे शिंदे साहेबांच्या मागे पूर्ण ताकतीने उभा राहुन मतदान करणार असल्याचे माजी सरपंच राजेंद्र ढोले म्हणाले.