परम आदरणीय प्राध्यापक राम शिंदे सर…

कर्जत : प्रा. किरण जगताप

परम आदरणीय प्राध्यापक राम शिंदे सर…

पहिलं म्हणजे माझ्या पत्नीला बुथमध्ये जाण्यास परवानगी होती आणि दुसरं म्हणजे खुरंगेवाडीच्या मतदान केंद्राबाहेर पोलिसांसमोर तुम्ही पाळलेल्या गुंडांकडून धुडगूस सुरु असताना सुरक्षित जागा म्हणून माझी पत्नी मतदान केंद्रात थांबली तर आपल्या पोटात कळ उठायचं कारण काय? उलट तिच्यासोबतचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी तुमच्या गुंडांनी हुज्जत घातली. याची निवडणूक आयोगाकडं सात वेळा तक्रार केली असून त्याचेही पुरावे माझ्याकडं आहेत. पण असो, तिथं माझी पत्नीच काय इतर कोणतीही महिला भगिनी असती आणि तिच्या केसालाही धक्का लागला असता तर पुढं जे घडलं असतं त्याची जबर किंमत चुकवणं तुम्हाला आणि तुमच्या बगलबच्च्यांनाही परवडलं नसतं, हे लक्षात ठेवा!

चार दिवसांपूर्वी तुमच्या स्टेजवरुन महिलांविषयी वापरलेली अश्लिल भाषा आणि केलेल्या विकृत हातवाऱ्यातून तुम्ही तुमच्या संस्कृतीचं आणि लायकीचं जाहीर प्रदर्शन केलंच होतं, शिवाय आज माझ्या पत्नीचा व्हिडिओ पोस्ट करुन पुन्हा महिलांविषयी आपली विकृती दाखवून दिली… पण तरीही मूळ विषय संपणार नाही… मतदारांना पैसे वाटताना पकडलेली व्यक्ती तुमची कोण नातेवाईक लागते आणि त्याच्याकडं दिलेले लाखो रुपये तुम्ही कुठून आणले? याचा हिशोब आधी द्या !

– रोहित पवार, आमदार