प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा कर्जतमध्ये सत्कार

कर्जत : प्रा. किरण जगताप

अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी बाळासाहेब तापकीर व व्हाईस चेअरमनपदी योगेश वाघमारे यांची निवड झाली. त्याबद्दल कर्जत येथील शिक्षक बँक सभागृहात गुरुवारी त्यांचा सत्कार करण्यात आला.

गुरूमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हा नेते बापुसाहेब तांबे यांच्या उपस्थितीत व माजी चेअरमन व उच्च अधिकारी समितीचे अध्यक्ष शरद सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. हा सत्कार समारंभ कुलट संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबन गाडेकर, शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब कापसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बापूसाहेब तांबे यांनी सभासद हित डोळ्यासमोर ठेवूनच कारभार होत राहील याची ग्वाही दिली व नूतन चेअरमन बाळासाहेब तापकीर यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष बबन गाडेकर यांनी आपल्या भाषणात शुभेच्छा देताना पूर्ण जिल्ह्यातील सभासद यांच्या मनातील कारभार करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
सत्कार समारंभास उत्तर देताना चेअरमन बाळासाहेब तापकीर यांनी मागील ९ महिन्यात आजच्या आनंदाच्या दिवसांची सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन केले. बँक हित व सभासद हित या दोहोंचा विचार करून कारभार करण्यात येणार असल्याचे सांगत सर्व जिल्हा नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानले.

अध्यक्षीय भाषणात बँकेचे माजी चेअरमन शरद सुद्रीक यांनी मागील काळातील कटू आठवणी विसरून नवनिर्मितीसाठी कान मंत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक गुरूमाऊली सदिच्छा मंडळाचे कार्याध्यक्ष आबासाहेब सुर्यवंशी यांनी केले. पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष महादेव गांगर्डे, गुरूमाऊली मंडळाचे नेते दशरथ देशमुख, योगेश खेडकर, ईश्वर सोलनकर, ऐक्य मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय परहर, राम उदमले यांनी आपल्या मनोगतातून नूतन चेअरमन व संचालक बोर्डास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संघाचे तालुका अध्यक्ष बजरंग गोडसे यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील राज्य संघाचे सहचिटणीस अनिल टकले, संघाचे जिल्हा सरचिटणीस डी.एम.शिंदे, जूनी पेन्शनचे माजी अध्यक्ष सचिन नाबगे, विश्वस्त नवनाथ दिवटे, रमेश सुपेकर, शिवाजी बांदल, प्रदिप शेलार, मंडळाचे तालुका अध्यक्ष प्रकाश नेटके, संघाचे उपाध्यक्ष दिपक भापकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आदिकराव बचाटे, अशोक घालमे, गुरूमाऊली मंडळाचे नेते गंगाधर नष्टे, राजेंद्र माळवदकर, बाळासाहेब वाघमारे,भागवत खेडकर, ज्ञानदेव सुद्रिक, विठ्ठल सुद्रिक, अशोक सावंत, विशाल काळे, रामकृष्ण शेटे, विठ्ठल साळवे, बाळकृष्ण काळे, दत्तात्रय काळे, अमोल गांगर्डे, किरण कोल्हे, संतोष अनुभूले, भारत भवर, अंकुश झिंजे, विजय कडुस, महांडुळे, बाळासाहेब बोरकर, गणेश ठोंबरे, ज्ञानेश्वर गायकवाड, सोमवंशी, अविनाश घोडके, महादेव गोडसे, सुनिल गोडसे, संदिप कांबळे, दशरथ कदम, नवनाथ औताडे, गटकळ, जितेंद्र तरवारे, अविनाश पवार व गुरूमाऊली सदिच्छा मंडळ सर्व संघ प्रेमी शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजय सोनवणे यांनी आभार मानले.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी