आनंद तरंगे यांचे निधन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत येथील प्रसिद्ध डॉ. दिनकर तरंगे यांचे चिरंजीव आनंद, वय ५२ वर्ष यांचे अल्पशा आजाराने बडोदा येथे निधन झाले. ते बडोदा येथे राहत होते. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

आनंद दिनकर तरंगे हे जी डी आर्ट ही कला शाखेतील पदवी प्राप्त केलेले होते. त्यांनी या क्षेत्रामध्ये बडोदा परिसरामध्ये आपला चांगला नावलौकिक निर्माण केला होता. त्यांनी स्वतःची क्रिस्टल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काढली होती. आणि या कंपनीचा या परिसरामध्ये चांगला विस्तार केलेला आहे.