पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवर  २ टक्के कॅशबॅक मिळवा : अक्षय राऊत

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- राशीन महामार्गालगतच्या एचपी माऊली पेट्रो स्टेशनमध्ये ९०.९४ रुपयांच्या डिझेल खरेदीवर २ रुपये कॅशबैक म्हणजेच डिझेल ८८.९४ रुपयांना पडणार व १०४.४४ रुपयांच्या पेट्रोल खरेदीवर २ रुपये कॅशबॅक म्हणजेच १०२.४४ रुपयात मिळेल. जिओपेक्षा १ रुपये कमी व नायरापेक्षा १.३३ पैसे कमी आईओसीएल आणि बीपीसीएल पेक्षा २.३० पैसे रूपयांनी बचत होणार आहे, असे माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक अक्षय राऊत यांनी म्हटले आहे.

एचपी माऊली पेट्रो स्टेशनचे रेट हे इतर पंपाचा तुलनेत कमी राहतील. इतर कंपनीचे रेट ऑफरपुरते कमी होतात त्यानंतर पुन्हा वाढतात पण एचपी माऊली पेट्रो स्टेशनचे रेट इतर कंपनीचे ऑफर वगळता कायमस्वरूपी कमी राहतील एकदा पेट्रोल स्टेशनवर या आणि परफॉर्मन्स पहा. स्पोर्ट बाईक व स्पोर्ट कारसाठी पावर पेट्रोल उपलब्ध आहे. फ्री नायट्रोजन सेवा व २४ तास सेवा उपलब्ध आहे. ॲड ब्ल्यू सर्व प्रकारचे ऑइल माफक दरात उपलब्ध आहे. एचपी म्हणजे शुद्धता, मायलेज आणि शक्ती आहे.

राऊत पुढे म्हणाले, गाडीची टाकी फुल करा आणि मायलेज चेक करा तेव्हा आपल्याला कळेल की इतर पंपाच्या तुलनेत टू व्हीलर गाडी १५ ते २० किलोमीटरचे मायलेज जास्त देते. जेसीबी, ट्रॅक्टर आणि पोकलेन या गाड्यांमध्ये १ ते २ तासांचा फरक पडत आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी