साक्षी उबाळे हिचे दहावीच्या परीक्षेत यश

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत येथील साक्षी संतोष उबाळे हिने दहावी बोर्ड परीक्षेमध्ये ८३ टक्के गुण मिळवून समर्थ माध्यमिक विद्यालयामध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.

साक्षी उबाळे अगोदर मुंबई येथे राहत असून शिक्षण घेत होती. परंतु गेल्या वर्षी तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे साक्षी तिच्या कुटुंबासह पुढील शिक्षणासाठी गावाकडे आली. वडिलांचे निधन झाले असताना सुद्धा ती खचली नाही आणि सतत अभ्यास करत राहिली.

तिच्या यशामुळे कुटुंबासह सर्व नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिची ही शैक्षणिक कामगिरी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या यशाबद्दल साक्षीला विविध क्षेत्रातून शुभेच्छा मिळत आहेत. तिच्या उज्वल भविष्यासाठी राहुल अडसूळने शुभेच्छा दिल्या आहेत.