
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून अखंड हिंदु समाज कर्जत तालुका यांच्या वतीने कर्जत येथील कापरेवाडी वेसजवळील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी तसेच भविष्यातील अतिक्रमणापासून मंदिराच्या संपूर्ण जागेचे संरक्षण व्हावे, यासाठी तटबंदी घालण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणात शशिकांत दत्तात्रय बोंगणे, स्वाती शशिकांत बोंगणे, शुभम अशोक माने, चेतक चंदनसिंग परदेशी, राहुल बापू म्हस्के आणि महेंद्र अरुण गोडसे हे सहभागी झाले आहेत.

अखंड हिंदू समाजाने प्रशासनाकडे त्वरीत कार्यवाहीची मागणी केली असून, मंदिर परिसर पवित्र आणि सार्वजनिक असल्याने ते कोणत्याही अतिक्रमणापासून मुक्त राहावे, असा ठाम आग्रह उपोषणकर्त्यांनी धरला आहे.
कर्जत येथील प्राचीन हनुमान मंदिर परिसरातील जिहाद्यांचे अनधिकृत अतिक्रमणाविरोधात शुक्रवारी ( दि. १६ ) सकाळी १० वाजता कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको तसेच कर्जत शहर बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती, अखंड हिंदू समाज कर्जत तालुका यांच्या वतीने देण्यात आली आहे.