एम प्रकाश ऑईल इंडस्ट्रीज कंपनीचा रविवारी शुभारंभ

कर्जत : प्रा. किरण जगताप

एम प्रकाश ऑईल इंडस्ट्रीज कंपनीचा भव्य शुभारंभ २५ मे २०२५ रोजी गुरुवर्य हभप दत्तात्रय महाराज अनारसे यांच्या शुभहस्ते सुरवसे फार्म, कर्जत-करमाळा रोड, धांडेवाडी, कर्जत या ठिकाणी होणार आहे. हभप मालोजी सुरवसे, आई – वडील व समस्त सुरवसे परिवाराच्या शुभ आशीर्वादाने या ऑईल मिलचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

याप्रसंगी कृषी, बँकिंग, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, आप्तेष्ट, नातेवाईक व सर्व ग्रामस्थांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जत व परिसरातील तमाम नागरिकांसाठी कोल्ड प्रेस /नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शुद्ध शेंगदाणा, सूर्यफूल आणि करडई तेल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कर्जतकरांना नैसर्गिक कोल्ड प्रेस पद्धतीने बनवलेले शुद्ध खाद्यतेल मिळणार आहे.

यानिमित्ताने चेअरमन महादेव सुरवसे, प्रा. राम काळे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र गव्हाणे तसेच सर्व संचालक यांच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना या मंगल प्रसंगी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.