खांडवीमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील खांडवी या गावात भीमरत्न प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २० मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता भगवान बुद्ध पूजेचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ९ ते १० या वेळेत खीरदान केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध प्रबोधनकार, विनोदी कलाकार आणि खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनपर सत्यवाणीचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक जागृती आणि बौद्ध विचारसरणीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत बुद्ध प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर ८ ते ९ वाजेपर्यंत मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शन होणार आहे. रात्री ९ ते १२ या वेळेत सत्यपाल महाराज यांची प्रबोधनपर सत्यवाणी सादर होईल. सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भीमरत्न प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.