शिवसेना डॉक्टर्स सेल कर्जत तालुका उपप्रमुखपदी डॉ. संतोष बोरुडे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. संतोष संभाजी बोरुडे यांना शिवसेना डॉक्टर्स सेल कर्जत तालुका उपप्रमुख तथा आयुष होमिओपॅथी विंग कर्जत तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्ती पत्र लोकनाथ फाऊंडेशन, रुग्णदूत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रदेश प्रमुख शिवसेना डॉक्टर सेल डॉ. करणसिंह अशोकराव गाडे यांनी प्रदान केले.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या कर्तृत्वाला स्मरून व शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना डॉक्टर सेल पक्षप्रमुख डॉ. धनंजय पडवळ यांचे नेतृत्वाखाली नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीचा कालावधी ३ वर्षांचा असेल. हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्या जनहित कार्याचा प्रचार व प्रसार करत पक्षवाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी