
सकल हिंदू समाजाच्या वतीने कर्जत तालुक्यातील कापरेवाडी वेस येथील मारुती मंदिर परिसर गट नंबर १ समोरील व परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. १४ मे २०२५ रोजी पासून आमरण उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा दहावा दिवस आहे.

दि. २३ मे २०२५ रोजी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका मोहिनी दत्तात्रय पिसाळ यांनी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच आकाश हरणावर, नितीन तोरडमल, शशिकांत बोंगाणे, शुभम माने, संदीप पठाडे आणि दत्तात्रय पिसाळ उपस्थित होते.

याप्रसंगी प्रशासनाला व अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन हे अतिक्रमण काढण्यात यावे असे आवाहन मोहिनी पिसाळ यांनी केले आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी