
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील संजय मल्हारराव निंबाळकर यांची सहाय्यक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई येथे नियुक्ती झाली आली.

संजय निंबाळकर अतिशय गरीब कुटुंबातील होते. ते दररोज पायी ७ किलोमीटर चालत जाऊन सन १९८२ रोजी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयात बारावी उत्तीर्ण होऊन अतिशय कष्टाने बी. एस्सी उत्तीर्ण झाले. त्यानंतर नोकरीच्या शोधात असताना वडिलांनी विवाह केला पण संसारात त्यांचे मन लागत नव्हते. त्यांनी निश्चय केला की आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाहिजे. पण त्यांना ग्रंथालयाची सोय नव्हती तसेच अभ्यास करायलाही योग्य जागा नव्हती. तरीही मनाची तयारी करून आपल्याच मळ्यामध्ये पुरातन काळातील महादेवाचे श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये कसलेही सुविधा नसताना लाईट वगैरे निर्मनुष्य ठिकाणी १८-१८ तास अभ्यास करून एमपीएससी परीक्षा पास करून आपल्या जीवनाचे स्वप्न पूर्ण केले.

सन १९९५ रोजी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. तेव्हापासून प्रामाणिकपणे कष्ट व गरिबाला न्याय मिळवून येण्याची धडपड सतत करत होते. संजय निंबाळकर यांनी ३५० पुरस्कार मिळवून जनतेला संरक्षण देण्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. ते आपले काम करत असताना आपण समाजाचे कोणीतरी लागतो या जाणिवेतून समाजसेवा करत होते. त्यांनी अमेरिकेतून सामाजिक न्याय व संवर्धन यात भरीव काम केल्यामुळे सन २०२२ मध्ये अमेरिकेने राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले.
निंबाळकर यांच्या सेवेच्या कालावधीमध्ये मुंबई, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, नाशिक आणि आगरी पाडा या ठिकाणी सेवा केली असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगरी पाडा येथून २६ मे २०२५ रोजी प्रामाणिक कामाच्या जोरावर त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई येथे नियुक्ती झाल्यामुळे कर्जत तालुक्यातून व कोरेगाव परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात येत आहेत.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी