शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा खादी ग्रामोद्योग संघाच्या वतीने सन्मान

कर्जत : प्रा. किरण जगताप

शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम खादी ग्रामोद्योग संघ, कर्जत यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी, अहिल्यानगर दक्षिणचे युवक जिल्हा उपाध्यक्ष दिपक ससाने यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. खादी ग्रामोद्योग संघ, कर्जत आणि लोककल्याण बांधकाम कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवर व मित्रपरिवाराच्या वतीने दिपक ससाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या चळवळीमध्ये कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असून अशा कार्यकर्त्यांचा सन्मान केल्याने सामाजिक कार्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते अशी भावना खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन रोहनभाऊ कदम यांच्या माध्यमातून यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी कर्जत येथील खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन रोहनभाऊ कदम, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार चांगदेव आप्पा सरोदे, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गाडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संजय शेलार, वंचित बहुजन यवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, लोककल्याण बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण अडसूळ, बौद्धाचार्य गोदड समुद्र, वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष विकास समुद्र, लोककल्याण बांधकाम कामगार संघटनेचे सचिव राहुल अडसूळ, करण माने यांच्यासह मित्रपरिवार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

महापुरुषांच्या विचारांवर चालणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढून समाजहिताच्या कार्याला अधिक बळ मिळेल असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. हा कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित सर्व मान्यवरांनी दिपक ससाने यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.