माळी महासंघ उद्योजक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रविंद्र दत्तात्रय अनारसे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव येथील संजीवनी उद्योग समूहाचे संचालक व उद्योजक रविंद्र अनारसे यांनी सामाजिक स्तरावर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची माळी महासंघाच्या वर्धापनदिनानिमित्ताने माळी महासंघ उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

निवड पत्रामध्ये जिल्हाध्यक्ष भूषण माधव भुजबळ यांनी म्हटले आहे, आपल्या सामाजिक कार्याचा व अनुभवाचा फायदा निश्चितच महासंघाच्या संघटना बांधणीसाठी होईल. १४ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे म्हटले आहे. या निवडीबद्दल त्यांचे लकी उद्योग समूहाचे संचालक विठ्ठल गदादे, परशुराम गदादे, दादासाहेब गदादे, अतुल नेवसे, हरिभाऊ गदादे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

निवडीनंतर बोलताना रवींद्र अनारसे म्हणाले, महासंघाने केली माझी निवड ही सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. महासंघातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध उद्योजकांना संघटित करून महासंघ मजबूत करणार आहे.