आ. रोहित पवार हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही तर समाजकार्यासाठी राजकारणात

कर्जत : प्रा. किरण जगताप

आ. रोहितदादा पवार हे सरळ विचारसरणीचे नेते आहेत. त्यांच्या विचारात स्पष्टता आणि प्रामाणिकता असल्यामुळे त्यांच्यासमोर कितीही आव्हाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा मार्ग कोणी रोखू शकत नाहीत. आ. रोहितदादा यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्वितीय ताकद आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे.



रोहितदादांनी कर्जत – जामखेड मतदारसंघामध्ये केलेले कार्य प्रचंड असल्यामुळे त्यांना कोणीही कितीही विरोध केला तरी विजय त्यांचाच होणार आहे. कर्जत-जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य जनता, जेष्ठ नागरिक, युवक-युवती आणि लहान-मोठ्या सर्वांचा आ. रोहित पवार यांच्यावरचा विश्वास हेच त्यांचे यश असल्याचे कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे.


आ. रोहित पवार यांचे नेतृत्व लोकांशी जुळलेले असून त्यांची सामाजिक कामगिरी, सर्वांना एकत्र ठेवण्याची क्षमता आणि त्यांचा प्रामाणिकपणा यामुळे ते या मतदारसंघाचे लोकप्रिय नेते झाले आहेत. त्यांनी राजकारणात फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर समाजहितासाठी झोकून देऊन काम केले आहे. त्यांची ही भूमिका त्यांना समाजात आदराचे स्थान मिळवून देत आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्य आणि निस्वार्थतेने काम करणाऱ्या या नेत्यामुळे समाजात एक सकारात्मक परिवर्तन घडत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे