कर्जत शहरातील कुळधरण रोडच्या प्रभातनगर येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक आरोग्य सेवांसाठी ख्यातनाम आहे. एमडी, मेडिसिन २४ तास उपलब्ध असणारे कर्जत, जामखेड व श्रीगोंदा तालुक्यातील हे एकमेव हॉस्पिटल आहे. येथे २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या आकस्मिक उपचारांसाठी तत्पर व्यवस्था असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या हॉस्पिटलने आरोग्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. ज्यामध्ये डॉ. सुदर्शन भा. जाधव (एमबीबीएस, डी.एन.बी.), डॉ. मधुकर शांतीलाल कोपनर (एम.एस. स्त्रीरोग), डॉ. निखिल बापूसाहेब नेटके (एम.डी.), डॉ. आशिष चं. चौधरी (एम.डी. बालरोग), डॉ. मयूर बापूसाहेब नेटके (एमबीबीएस), डॉ. मृणालिनी जाधव (बीएएमएस), डॉ. योजना कोपनर (बीएएमएस, डीजीओ), डॉ. अंकिता नेटके (बीएएमएस), डॉ. जागृती चौधरी (फिजिओथेरपिस्ट) यांचा समावेश आहे.
हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग, मेंदूविकार, हृदयविकार, विषबाधा, सर्पदंश, अर्धांगवायू, मधुमेह उपचार व संपूर्ण तपासणी यंत्रणा, हाडांच्या विकारांचे उपचार, प्रसूती व स्त्रीरोग, मणक्याचे विकार, मूत्रपिंडाचे विकार,
लहान मुले व नवजात बालकांची अतिदक्षता सेवा, बालरोग विभाग, सुसज्ज आंतररुग्ण विभाग, विशेष रुग्ण कक्ष, डायलिसिस सेवा, सर्वसाधारण वॉर्ड, तसेच २४ तास उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक औषध उपचार, वैद्यकीय साधनांची सुविधा व वातानुकूलित रूम्स उपलब्ध आहेत.
रुग्णालयात थायरोईड उपचार, सुरक्षित लॅब सेवा, तसेच वैद्यकीय आणि शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला जातो. सर्व तपासण्या अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असून रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी डॉक्टरांकडून तत्परता दाखवली जाते. तीन महिन्यांमध्ये या हॉस्पिटलमधून अनेक हृदयविकार, अर्धांगवायू, मेंदूविकार तसेच ॲक्सीडेंट पेशंटचे प्राण वाचलेले आहेत. हॉस्पिटलमधील उत्कृष्ट सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे हॉस्पिटल नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी एक महत्वपूर्ण ठिकाण ठरले आहे. अधिकाधिक तत्पर रुग्णसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे डॉक्टरांच्या टीमने म्हटले आहे.
वैभव पवार, कर्जत तालुका प्रतिनिधी