कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथे दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या जबर मारहाणीत मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. मारुती झिंजे व यांचा मुलगा, पत्नी, बहिण,जावई, विहीन, मुलगी यांना मारहाण करणारे बारा आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती मारुती झिंजे यांनी दिली.
झिंजे कुटुंबीयांच्या घरी येऊन काही समाजकंटकांनी लोखंडी रॉड, गज,कुऱ्हाड आणि काट्यांनी मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात मारुती झिंजे यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. यातील मुख्य आरोपी शिवाजी झुंबर इरकर, ऋषिकेश झुंबर इरकर, अमर महारनवर, परसू डुकरे, ऋषिकेश व्होटकर, बापू इरकर, सुजित लाड, नितीन महारनवर, ऋषिकेश महारनवर, जालिंदर जानकर, बिरू इरकर यांच्यावर विविध गांभीर कलमाखाली मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला पकडले नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे. शिवाजी इरकर या एकच आरोपीला अटक झाली असून इतर आरोपी फरार आहेत. झिंजे कुटुंबीयांची असे मागणी आहे की इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावे अन्यथा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. फरार आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. पोलिसांना आर्थिक गोष्टीतून मॅनेज करण्यात तर आले नाही ना, असे झिंजे यांनी म्हटले आहे.
फिर्यादीच्या वतीने जिल्हा न्यायालयात ॲड.सुमित पाटील यांनी तोंडी व लेखी स्वरूपात प्रभावी युक्तिवाद केला त्यामुळे जिल्हा न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला. इतक्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात पोलिसांना आरोपी सापडत नाही हे आश्चर्याचे कारण बनले आहे. वारंवार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटूनही आरोपी अद्याप फरार असल्यामुळे मला न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्व फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करून मला न्याय द्यावा असे फिर्यादी मारुती झिंजे यांनी म्हटले आहे.