
कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या नुतन मंडल अध्यक्षपदाची प्रक्रिया कर्जत व राशीन येथे पार पडली. नवीन नियमानुसार पक्षामध्ये अध्यक्ष पदासाठी दोन मंडलांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यामध्ये कर्जत मंडल व राशीन मंडल असे विभाजन करण्यात आले आहे. या नवीन पदाधिकारी निवडीसाठी कर्जत- जामखेड मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक उपस्थित होते. तर कर्जत मंडलाचे निरीक्षक म्हणून शाम पिंपळे व राशीन मंडलाचे निरीक्षक राहुल कारखिले होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शेखर खरमरे होते. या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही चर्चात्मक बैठक पार पडली.

यावेळी पक्षाच्या नियमानुसार जरी सर्व प्रक्रिया पार पडली असली तरी सर्व उपस्थितांनी निवडीचे सर्वाधिकार हे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना दिले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी या निवड प्रक्रीयेत स्वतः उपस्थित राहून भाग घेताना दिसत आहेत. मात्र कर्जत- जामखेड मतदारसंघामध्ये प्रा. राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. उपस्थित न राहता मनाचा मोठेपणा दाखवला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

नुतन मंडल अध्यक्ष निवडी संदर्भात पक्षाकडून वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मंडल अध्यक्ष पदासाठी ३५ ते ४५ वयोगटातील ठरवला जाईल. यासोबतच मंडल अध्यक्षांना पक्षाचे प्राथमिक आणि सक्रिय सदस्य असणे तसेच भूतकाळात पक्षात काही जबाबदारी असणे बंधनकारक आहे.
अनुशासनहीनता आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व आरोप असलेल्यांना या प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नसल्याचे पक्षाचे प्रभारी बाळासाहेब महाडिक यांनी सांगितले तर जामखेड तालुक्यातील मंडल अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रिया आज पार पडणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, मार्केट कमिटीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपा नेते अशोकराव खेडकर, जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष सुनील यादव, अल्लाउद्दीन काझी, विनोद दळवी, प्रकाश शिंदे, मंगेश जगताप, धनंजय मोरे, प्रतिभाताई रेणुकर , काकासाहेब धांडे, तात्या माने, डॉ. सुनील गावडे, शहाजीराजे भोसले, विक्रमराजे भोसले, बंडा मोढळे यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, गट प्रमुख, गण प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, व बुथ प्रमुखांसह इच्छूक उमेदवार उपस्थित होते.
मंडलाध्यक्ष पदासाठी कर्जतमध्ये ५ जण इच्छुक होते. पप्पूशेठ धोदाड, अनिल गदादे, युवराज शेळके, स्वप्नील तोरडमल, गणेश क्षीरसागर तर राशीन मंडलामध्ये एकूण ९ जण इच्छुक होते. सुनिल काळे, राहुल निंबोरे, शोएब काझी, गणेश पालवे, गोपीनाथ जगताप, विजय पोटरे, अंबादास घोडके, सुदर्शन कोपनर आणि डॉ. विलास राऊत या सर्व इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केली व सर्वस्वी अधिकार प्रा. राम शिंदे यांना देऊन बैठक संपन्न झाली.