‘गौरी शुगर’ने ऊस बिल थकवले ; कर्जत तालुक्यातील शेतकरी …

कर्जत : प्रा. किरण जगताप

ओंकार शुगर ग्रुपच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने चालू ऊस गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे दोन महिन्यांपासून ऊस बिल थकवले आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून या कारखान्याने उसाचे बिल थकवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे तातडीने मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित लढा देण्याची भूमिका घेतली आहे.

युवक क्रांती दलाच्या वतीने शेतकऱ्यांना संघटित करून या प्रश्नावर आवाज उठवला जाणार आहे. इतर शेतकऱ्यांबरोबरच कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने या कारखान्याला आपला ऊस घातला. मात्र, उसाचे बिल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

ज्या शेतकऱ्यांचा ऊस ‘गौरी शुगर’ला गेला आहे, मात्र अद्यापही बिल मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांनी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा. सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून लवकरच त्यांची बैठक घेतली जाईल. त्यानंतर साखर आयुक्त, पुणे यांना निवेदन देऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

संपर्क : आप्पा अनारसे, राज्य संघटक, युक्रांद ( 9096554419 ), ॲड. स्वप्निल तोंडे, पुणे शहराध्यक्ष, युक्रांद  ( 9923523254 ), किरण जगताप, कर्जत तालुकाध्यक्ष, युक्रांद ( 8830522275 ), दादा राऊत, राशीन शहराध्यक्ष, युक्रांद ( 9730967696 )