
दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक मंथन परीक्षेमध्ये कर्जत – वालवड रोडनजीकच्या स्वामी समर्थ मंदिरामागील पिंक पेटल्स क्युरिअस किड्स या प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचे नाव उज्वल केले आहे.

यामध्ये इयत्ता दुसरीतील सुयोग हुमे याने मंथन परीक्षेत केंद्रात प्रथम, राज्यात पंधरावा तर जिल्ह्यात दहावा क्रमांक मिळवला आहे. इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी अनाशा सय्यद हिने केंद्रात दुसरा, राज्यात तेरावा तर जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळविला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवून शाळेची मान उंचावली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे पिंक पेटल्स किड्स या प्रायमरी स्कूलने केंद्रीय, राज्य व जिल्हास्तरावर आपली छाप उमटवली आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना या प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका जुलेखा सय्यद म्हणाल्या, आमच्या विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेमध्ये मिळवलेली यश हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. सुयोग आणि आनाशा या दोघांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या यशामागे शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि शाळेचे समृद्ध शैक्षणिक वातावरण हेच खरे बळ आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी